
Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल आहे. या बंडावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या सर्व घडामोडींपासून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) अलिप्त होते. मात्र त्यांनी आता नुकतीच या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अभिजीत बुचुकले म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गद्दार म्हणतात तर अजित पवार (Ajit Pawar) कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विधानभवनामध्ये अजित पवार यांच्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही त्याबद्दल देखील अभिजीत बीचुकले यांनी आश्चर्य व्यक्त केल आहे.
त्याचबरोबर ज्यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिजीत बीचुकले यांचे मीन्स वायरल झाले होते. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना अभिजीत बीचुकले म्हणाले, ज्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने मला सोशल मीडियावर उचलून धरले त्या सर्व लोकांचे मी आभार मानत आहे. असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचं राजकारण दिशाहीन
सध्या महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण तत्त्वहीन आणि दिशाहीन आहे. तमाम जनतेच्या आशांना आणि दिशांना धूळ चारणारं हे सध्याचे राजकारण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करण्याची आता गरज आहे. मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही मी जे केले ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर केले असे देखील अभिजीत बीचुकले म्हणाले आहेत.
Sharad Pawar । … तर राज्यात सत्तांतर होईल; शरद पवारांचं सूचक वक्तव्य