Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक निवेदन जारी करून भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचे कारण स्पष्ट केले. अजित पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “विचार आणि उद्दिष्टाशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने मी माझी भूमिका बजावली आहे.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या देशात महत्त्वाची विकासकामे होत असल्याचे मला आढळले. नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला आवडले. माझी आणि त्यांची कार्यशैली खूप सारखीच आहे. ज्येष्ठांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही.” असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
पाहा अजित पवारांनी निवेदनात नेमकं काय म्हंटलय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच… pic.twitter.com/3fIlE1DFQU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 25, 2024