Ajit Pawar । अजित पवार मुख्यमंत्री होणार! भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Ajit Pawar will be the Chief Minister! Excitement due to BJP leader's claim

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून आपल्याला राज्यात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. २ जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) भगदाड पाडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. हे प्रकरण इथवरच थांबले नाही तर त्यांनी आता आपल्याकडे जास्त आमदारांचा पाठिंबा असून पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. (Latest Marthi News)

अजित पवारांना पुतण्या देणार शह! आगामी निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची चर्चा

अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीसांचा साथ दिली आहे. अजित पवार यांच्या पक्षात येण्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहेत. लवकरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि अजित पवार हे नवीन मुख्यमंत्री होतील असा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता भाजप एका नेत्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.

ब्रेकिंग! छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

“जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असल्यास तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केले आहे. आता अजित पवार भाजपसोबत आले आहेत त्याचा त्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर

आगामी लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा भाजप अन् मित्र पक्षाला दिल्या जातील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांचा आम्हाला फायदाच होईल. सध्या पुणे शहरात भाजपचे ९८ नगरसेवक असल्याने ही जागा भाजपला मिळेल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Onion Price Hike । शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ

Spread the love