
राज्याच्या राजकारणात अनेक वेगेवेगळ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधात एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यामध्येच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बाईनं पाडलं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) जोरदार टीका केली होती. आता नारायण राणे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सलमान खानला पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचा हिरो आता म्हतारा दिसू लागलाय”
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, माझ्या नादाला लागू नका, अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, अशा शब्दात राणे यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
अभिजित बिचुकले यांनी केली मोठी मागणी; म्हणाले, “कसबा पोटनिवडणूक रद्द करा”
त्याचबरोबर नारायण राणे पुढे म्हणाले की, “बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही.” असं देखील यावेळी राणे म्हणाले आहेत.
“ती दाढीपण जाळून टाकू”, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान