राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे लवकरच राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे ते भाजपसोबत जाणार या चर्चेला देखील उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळे सुरळीत असल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंना यावेळी ‘ती’ खुर्ची मिळणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले वक्तव्य
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखीतीमध्ये नाना पटोले म्हणाले, माझा आणि अजित पवार यांचा जास्त काही संवाद होत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही जास्त सांगू शकत नाही. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मला माहित नाही? मात्र अजित पवार असं वेगळं काही करतील असे वाटत नाही असं नाना पटोले म्हणाले आहेत.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “भाजपविरोधी जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. ही वैचारीक लढाई असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!