अजित पवार शांत बसणार नाहीत, ते दगाफटका करणार; मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar will not sit still, he will go on a rampage; A big secret explosion

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबाबत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण देऊन देखील या चर्चा अजूनही थांबल्या नाहीत. अंजली दमानिया यांनी अजित पवारांबाबत केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान शरद पवारांच्या ( Sharad Pawar) राजीनाम्या नाट्याला सुद्धा यासोबत जोडले गेले आहे. शरद पवारांनी अजित पवारांबाबत सुरू असणाऱ्या चर्चा आणि संभाव्य पक्षप्रवेश थांबवण्यासाठी हा डाव टाकला होता असे म्हंटले जात आहे.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; निर्मात्याने थेट कोर्टात…

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damaniya) यांना विचारण्यात आले असता त्यांनी मोठे विधान केले आहे. पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य करत त्या म्हणाल्या की, ” अजित पवारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. अजित पवार हे शांत बसणाऱ्यातले नाहीत. दिवाळीपर्यंत ते परत आमदारांची जमवा जमव करून मोठा दगाफटका करतील.”

Uddhav Thackeray । राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल – उद्धव ठाकरे

अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेससोबत दगा फटका करतील का ? मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत हातमिळवणी करतील का ? अशा शंका अजित पवारांच्या भूमिकेबाबत निर्माण होत आहेत.

Virat Kohali । विराट कोहलीची त्याच्या जवळच्याच मित्राने केली पोलखोल; म्हणाला…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *