Site icon e लोकहित | Marathi News

पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय पूजा अजित पवार करणार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Ajit Pawar

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत असून ते लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच त्यांनी 2024 ला नाही तर आताही आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य केले होते. अशातच पुन्हा एकदा त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi News)

शाहरुखची लेक आता बॉलिवूड नाही तर शेती करणार?

लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. आगामी निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मविआचा मुख्यमंत्री कोण असणार? हे ठरले नसले तरी पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील. आपण संत तुकोबारायांच्या चरणी अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ गावात खरेदी केली कोट्यवधींची जमीन; किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का

नुकतीच अजित पवार यांनीआपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली होती, त्यावरून आता त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. असे असतानाच मिटकरी यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

भीषण अपघात! नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायकोचा कारमध्ये होरपळून मृत्यू; हृदय हेलावून टाकणारी घटना

Spread the love
Exit mobile version