Ajit Pawar । सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) तोंडावर आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरवात केली आहे. मात्र सध्या लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्हे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष मुर्हे यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. फक्त संतोष मुर्हेच नाही तर मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. संतोष मुऱ्हे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक असून त्यांची मावळ तालुक्यात मोठी ताकद आहे.
माहितीनुसार, नाराजीतून हा राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.