Ajit Pawar । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांच्याशी 20-30 मिनिटांची चर्चा केल्यानंतर भुजबळ दिल्लीला रवाना होणार आहेत.
Chhagan Bhujbal । राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप? छगन भुजबळ घेत आहेत मोठा निर्णय
दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भुजबळ आगामी निर्णयांवर विचार करण्याची शक्यता आहे. भुजबळ आणि फडणवीस यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. फडणवीस यांनी ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाबाबत आश्वासन दिले असून, भुजबळांनी या मुद्द्यावर 8-10 दिवसात पुन्हा भेट घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली.
ओबीसींच्या यशाच्या साक्षातकारामुळे महायुतीला चांगले यश मिळाले आहे, हे देखील फडणवीस यांनी म्हटले. भुजबळ यांच्या या भेटीनंतर आता त्यांचे पुढील निर्णय राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहेत.
Mumbai News । धक्कादायक! कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण