Ajit Pawar । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि आरोप-प्रत्यारोप काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आव्हाड यांनी अजित पवारांवर चुकते आरोप करत “मर्दाची औलाद असते तर म्हणाले असते की, शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली, मी सुद्धा एखादं वेगळं चिन्ह घेतो. असं केलं असतं तर मानलं असतं की, तुम्ही मर्दाची औलाद आहात…,” असा घणाघात केला.
Parth Pawar । मी शरद पवार यांना भेटायला जाणार; पार्थ पवार यांचे धक्कादायक वक्तव्य
आव्हाडांनी अजित पवारांवर घणाघात करत त्यांना पाकीटमारांची टोळी म्हणून संबोधले. “आमच्या पक्षात येऊन तुम्ही चोरलेल्या पक्षात फिरत आहात,” असे आव्हाडांनी आरोप केले. त्यांनी यावेळी अजित पवारांच्या नेतृत्वाबद्दलही शंका उपस्थित केली, आणि म्हटले की, शरद पवार यांचे नेतृत्व मोदींसमोर झुकले नाही. “पवार साहेब म्हणाले होते की, ‘मी एकटा राहिलो तरी चालेल; मी तरुणांमधून नवीन नेतृत्व तयार करेल,'” असे आव्हाडांनी नमूद केले.
Politics News | राजकारणातून मोठी बातमी! भाजपचा बडा नेता उमेदवारी मागे घेणार का?
त्याचबरोबर, जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “या लोकांनी देशात अमन आणि शांती बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे,” असा इशारा त्यांनी दिला, आणि नथुराम गोडसेच्या विचारसरणीला धक्का देण्याचा आरोप केला. या सर्व चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे, आणि आगामी निवडणुकांमध्ये आरोपांची मालिका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar । अजित पवार यांनी आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा केला