Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । रोहित पवार यांच्या आंदोलनावरून अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; ‘लोकप्रतिनिधींनी…

Ajit Pawar's angry reaction on Rohit Pawar's agitation, said; "People's representatives...

Ajit Pawar । मुंबई : कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला (Karjat Jamkhed MIDC) मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सरकारचं लक्ष वेधावे यासाठी विधानभवनातील (Vidhan Bhavan) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी एकटेच भर पावसात आंदोलनाला बसले आहेत. याचे पडसाद सभागृहात उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Jayant Savarkar । मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

अजित पवार म्हणाले की, ” त्यांच्या मागणीवरून सर्व संबंधितांसोबत चर्चा करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाईल. लोक प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे चेरअमन आणि मंत्री महोदयांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद गांभीर्याने घ्यायला पाहिजे. रोहित पवारांनी अशा पद्धतीने आंदोलन करणे उचित नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाला बसण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Rohit Sharma’s World Record । कोणालाही जमलं नाही ते ‘हिटमॅन’नं करून दाखवलं, वेगवान अर्धशतकासह रचला इतिहास

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सरकारने त्यांची समजूत घालून त्यांनी सभागृहात येऊन आपलं मत मांडवे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले आहेत. त्यामुळे आता रोहित पवार आपले आंदोलन मागे घेणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Monsoon session । रोहित पवार भर पावसात एकटेच बसले आंदोलनाला, केली ‘ही’ मागणी

Spread the love
Exit mobile version