सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी एका सभेमध्ये बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ब्रेकिंग! पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केल्या ‘या’ दोन मागण्या
अजित पवार म्हणाले, “आम्ही देखील सत्तेमध्ये होतो पण आम्ही कधी चुकीचं वागलो नाही. या सरकारच नक्की काय चाललंय? राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. सध्या खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान डोचक्यात येण्याची शक्यता आहे. असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटच खरी शिवसेना; निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, “राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये तुम्ही महिलांना का घेत नाही? तुमच्या पोटात दुखत का? मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करत नाही. हे अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे.” असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मेगा भरती; तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात