सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. यामध्येच आता शिंदे गटाकडून मंगळवारी १३ जून रोजी काही वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची जास्त पसंती असल्याचा दावा या जाहिरातीत एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
मोठी बातमी! २६ जूनला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार बारामतीला
यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. यामध्येच शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी भाजपाला (BJP) सुनावलं आहे. “शिंदे गटाच्या ४० आमदारांमुळेच भाजपा सत्तेत आहे”, असं ते म्हणाले. आता गजानन कीर्तीकर यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule । “तुमचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करते”, सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “गजानन कीर्तीकर हे खरंच बोललेत. यांच्या ४० आमदारांमुळे ते उपमुख्यमंत्री झालेत, त्यांच्या १०५ आमदारांमुळे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते असं म्हणणारच की”, असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
हे ही वाचा