
शिंदे गट आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल ( Sttasanghrsh Result) आज लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. यामुळे त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
अजित पवार म्हणाले, “निकाल काहीही लागला तरी माझं स्वतःच मत आहे की, सुप्रीम कोर्ट यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. याबाबत मी काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की, विधीमंडळातील ही बाब आहे त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही” असं अजित पवार म्हणाले आहेत.
“…म्हणून फडफडतात डोळ्यांच्या पापण्या”; ‘हे’ आहे खरे वैज्ञानिक कारण
त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, “आजच्या घडीला सरकारकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडं जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.
‘या’ दिवशी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येऊ शकतो; वाचा सविस्तर