
गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या निधनानंतर फक्त दोनच दिवसांमध्ये पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचाभावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर झळकले. बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलेल पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; 17 तास नेमके कुठं होते?
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान या पोटनिवडणुकीसंबधी अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी? ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे ज्यावेळी निवडणूक आयोग घोषणा करेल त्यावेळी यावर चर्चा करणे योग्य राहील. त्यामुळे रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
गौतमी आली, मात्र झालं असं की कार्यक्रमच रद्द करावा लागला; पाहा नेमकं काय आहे कारण?