Site icon e लोकहित | Marathi News

अजित पवार यांचा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?, राजकीय घडामोडींना वेग

Ajit Pawar's claim on the post of Jayant Patal's state president?, political developments speed up

Ajit Pawar | मागील काही दिवसापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा एका कार्यक्रमामध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. परंतु दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्याशिवाय त्यांनी इतर कार्यकर्त्यांकडेही जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

Honey Singh । मोठी बातमी! हनी सिंगला जिवे मारण्याची धमकी

परंतु त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण राजकीय वर्तुळात आले होते. यावर आता अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद नकोय, अखेर मनातलं बोलून दाखवलंच..

एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना पवार यांनी “मला विरोधी पक्षनेत्यात काही रस नव्हता. परंतु मी नेतेमंडळींच्या आग्रहाखातर या पदाची जबाबदारी घेतली असून एक वर्ष या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु आता बस झालं. मला या जबाबदारीतून मोकळ करा. मला आता संघटनेची जबाबदारी द्या.”, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यावर आता पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेत, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल; पाहा PHOTO

अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उघडपणे एकमेकांना बोचणारी वक्तव्य केली आहेत. गेल्या 5 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे. मात्र पक्षाच्या घटनेनुसार प्रत्येकी 3 वर्षात पद बदलण्याची तरतूद आहे. असं अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये म्हंटल आहे. त्याचबरोबर संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर तर दावा केला नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

Spread the love
Exit mobile version