Ajit Pawar | आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळीच शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने (Vande Bharat Express) नाशिकला (Nashik) रवाना झाले आहे. प्रवासादरम्यान त्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाने अजित पवार यांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या. तसेच ठाणे रेल्वे स्थानकावर त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. पक्षाच्या ठाणे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. (Latest Marathi News)
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadnavis) अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम नाशिक येथे पार पडणार आहे. नाशिक येथे अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नाशिक रोड ते शासकिय विश्रामग्रहापर्यंत बाइक रॅली देखील काढली जाणार आहे. दरम्यान, राज्यभरातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्या यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.
स्वस्तात मस्त! भारतातील बेस्ट बजेट स्मार्टफोन्सची यादी पाहा एका क्लिकवर
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे अजित पवार आज कार्यक्रमात काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
Tomato Price Hike | टोमॅटोमुळे लागली लॉटरी! दिवसाला चक्क 18 लाखांची कमाई