मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेला जोरदार टिका केली आहे. तुमचं कुटुंब या शिध्यावर चालून दाखवा. या शिध्यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो डाळ दिली जाते. याबाबतीत सरकारने चेष्टा चालवली आहे का? असा सवाल देखील अजित पवारांनी केला. जालन्यातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
नवीन जोडपे लग्नानंतर जेजुरीलाच का जातात? जाणून घ्या याबाबत माहिती
यावेळी अजित पवारांनी राज्यसरकारच्या पेपरात येणाऱ्या जाहीरातीबद्दलदेखील टिका केल्याचं पहायला मिळालं आहे. राज्य सरकार जाहीरातीवर प्रचंड पैसा खर्च करत आहे. सणासुदीला एखादी जाहीरात आल्यास समजू शकतो. दररोज जाहिराती (Advertisements) देणं याचा अर्थ काय. याबाबतीत मी माझ्या एका अधिकारी मित्राला विचारलं तेव्हा तो म्हणाला की सरकार आल्यानंतर पदवीधर निवडणुका झाल्या त्यात आलेलं अपयशामुळे त्याचे डोळे उघडले आहेत. त्यामुळं जाहीरातीवर खर्च सुरु आहे. असा अनुभव पवारांनी सांगितला.
“तू चीज बडी हैं मस्त मस्त…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा Video
पुण्यातील कसबा-चिंचवड निवडणुकीवरुन (Election) अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. महाराष्ट्र राज्यातील इतिहासात असं तोडफोड करुन सरकार आलं नव्हतं, असा टोलाही पवारांनी लगावला. 28 वर्ष भाजपकडं असलेली कसब्यातील जागा भाजपनं गमावली आहे. चिचंवडलादेखील आपला उमेदवार निवडून आला. आपलं सरकार एकत्र आणणं हे लोकांना मान्य नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. असंदेखील पवार म्हणाले.
सावधान! राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय; पाहा काय आहे परिस्थिती?
शिवसेनेच्या(Shivsena) चिन्हाचा वाददेखील पवारांनी बोलून दाखवला. बाळासाहेबांनी जाताना चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या हातात दिल होत. त्यांच्याकडून तेदेखील काढून घेण्यात आलं . असं कुठं असतं का? असा सवाल पवारांनी केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आपण काहीच बोलू शकत नाही. असं देखील पवार म्हणाले.