लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रस्तावित होता, परंतु ते करत नाहीत. कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय होईल याची भीती या सरकारला आहे. त्यांच्यातील एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. असे म्हणत अजित पवारांची ( Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगून देखील राहुल कलाटे मागे हटत नाहीत; चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘फक्त सभा मारून आणि बोलून लोकांची कामे होत नाहीत. यासाठी सर्वसामान्य लोकांना वेळ देणारा व कामं करणारा नेता लागतो. त्यामुळे लोकाभिमुख कामे करण्यावर भर द्या. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य लोकांसाठी वेळ देऊन त्यांची कामे करा.’
इंदापूर तालुक्यात चोरांची दहशत! शेतकऱ्याची लाखाभरांची शेळ्या-बोकडं केली लंपास
अनेक सर्वसामान्य लोक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आमदार व खासदार झाले. परंतु, त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र पुढील काळात गद्दारी करणारे निवडून येत नाहीत आणि हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सर्वसामान्य जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवून देईल. असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत
तसेच दिल्ली येथे बसून ‘काऊ हग डे’ ( Cow Hug Day) यांसारखे डे साजरे करण्याचे आदेश दिले जातात. मात्र आम्ही शेतकरी आहोत. गायीच्या अंगावरून हात फिरवतो. त्यांना हग करायला जात नाही. गाय लाथ मारते हे दिल्लीतील लोकांना माहीत नाही. जुनी जनावरे विकायची नाहीत असे भाजप सरकार सांगत आहे. मात्र या जनावरांच्या चाऱ्याचे काय? त्याची उपाययोजना काय? यावर हे सरकार निर्णय घेत नाही. हे निर्णयशून्य सरकार आहे. अशी सणसणीत टीका करत अजित पवारांनी भाजप ( BJP) सरकारला धारेवर धरले आहे.