अंजली दमानिया यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात सत्ता बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार भाजपशी हातमिळवणी करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
ब्रेकिंग! शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “भाजपसोबत जाण्यासाठी…”
अजित पवार ( Ajit Pawar) भाजपशी हातमिळवणी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान अजित पवारांच्या पाठीशी बरेच आमदार देखील आहेत. मात्र कोणत्याही लग्नासाठी तिथीची गरज असते. त्यासाठी कुळ बघून गुण सुद्धा जुळवावे लागतात. यानंतरच लग्न व्यवस्थित पार पडते. असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
किंग कोहली करणार बॉलिवूडमध्ये एंट्री? प्रसिद्ध अभिनेत्याच्या खुलास्याने चर्चांना उधाण
गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान अजित पवार भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले आहेत की, अजित पवार असं काहीही करणार नाहीत. हा आमचा विश्वास आहे. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून आम्ही पुढे जाणार आहोत.
अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; ट्विट करत म्हणाले, “भाजपाकडून…”
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मांडलेली भूमिका भयंकर असल्याचे म्हंटले आहे. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने ( INC) फार कष्ट घेतले. अशी माहिती देखील दिली आहे.