राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. (Retirement) यापार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या सर्वांच्यात संजय राऊत ( Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधक ठरली आहे.
Sharad Pawar | शरद पवार फेरविचार करणार! अजित पवारांकडे दिला ‘हा’ निरोप
मध्यंतरी सामनाच्या रोखठोक मधून पवार कुटुंबातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील अंतर्गत बाबींबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले होते आणि अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चेला बळ मिळाले होते. यामुळे पवार कुटुंबीय व पक्षाला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवारांनी (Ajit Pawar) संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला होता.
Whatsapp New Feature । व्हॉट्सअॅप मध्ये नवीन फिचर आले रे…, जाणून घ्या सविस्तर
यामुळे ऐरवी नको तिथे तोंड सोडणाऱ्या राऊतांनी सध्या तोंडाला कडी लावली आहे. राज्यात एवढी मोठी राजकीय घडामोड होऊन देखील संजय राऊतांनी जास्तीचे न बोलता जेवढ्यास तेवढी प्रतिक्रिया दिली आहे. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणार नाही. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. तसेच ही शरद पवारांची खेळी आहे, असे मला वाटत नाही. कुणी काय करावे याचे सल्ले मी देणार नाही. असे संजय राऊत शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर म्हणाले आहेत.
खुशखबर! शेतकऱ्यांना आता सवलतीच्या दरात ड्रोन मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली घोषणा