पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) 18 वे जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. आता यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे चुकीचं आहे. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. तरुणांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने तरुणांचा रोजगार बुडाला आहे.” अशी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याराज्यांत कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक राज्याकडे समान पाहिले पाहिजे. फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. राजकारणामध्ये एखाद्या भूमिकेला विरोध करणे चुकीचे नाही. जर चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही केले पाहिजे असे देखील राज ठाकरे म्हणाले.