‘अतिथी देवो भव:’ ही भारतीय संस्कृती आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार करून आपण त्यांचे स्वागत करतो. लोकप्रतिनिधींच्या शासकीय घरात देखील चांगला पाहुणचार असतो. मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुणचाराची चर्चा राज्यात सूरु आहे.
“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ( Ajit Pawar) यावरून सत्ताधारी पक्षाला टोकले देखील होते. वर्षा बंगल्यावरील खाणपानाचं बिल 2 कोटी 38 लाख इतके असल्याची माहिती देत, चहामध्ये सोन्याच पाणी घातलं होत का? असा सवाल उपस्थित केला होता. यानंतर, आता शिंदे-फडणवीस सरकारने या अवाढव्य पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Gold Rate: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले
राज्य सरकारचा ( State Government) हा निर्णय ‘अजित पवारांच्या बोलण्याचा परिणाम’ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ व उपमुख्यमंत्री यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी येणाऱ्या अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आला आहे. यामुळे आता या दोन्ही निवासस्थानवरील खर्च आटोक्यात येणार आहे. हा खर्च अंदाजे 3.50 कोटी व 1.50 कोटी असणार आहे.
बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग
शासकीय करारानुसार पदार्थांचे दर खालीलप्रमाणे
1) मसाला चहासाठी 14 रुपये
2) मसाला दुधासाठी 15 रुपये
3) शाकाहारी बुफेसाठी (साधारण) 160 रुपये
4) शाकाहारी बुफेसाठी (विशेष) 325 रुपये
5) मांसाहारी बुफेसाठी 175 रुपये
५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक होताच रोहित पवार संतापले; म्हणाले…