राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांबाबत मुंबई (Mumbai) पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी नव्यानं तपास सुरू केलाय. आता या प्रकरणावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका; टोमॅटोच्या दरात घसरण
नेमका काय आहे शिखर बँक घोटाळा?
2001 ते 2011 या काळात शिखर बँकेनं राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांना काहीच तारण न देता कर्ज दिलं होत. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे माणिकराव पाटील हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना ही कर्ज देण्यात आले असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता.
हा शिखर बँक घोटाळा तब्बल 2 हजार 61 कोटी रुपयांचा होता. तसेच या घोटाळ्यात सरकारी तिजोरीला 25 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. या शिखर बँकेकडून नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.
मोठी बातमी! सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल