
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे अशी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. याआधी देखील संभाजी ब्रिगेडने याबाबत मागणी केली होती. मिटकरींच्या यांच्या मागणीला आनंद दवे (Anand Dave) यांनी देखील विरोध दर्शविला आहे. आता पुण्याच्या नामकरणाबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्तीची
अजित पवार म्हणाले, “कोणाचाही अनादर करण्याचे काही कारण नाही सर्वच नवे चांगली आहेत. पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया असून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
धक्कादायक! मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात
नेमकं काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”. सध्या त्यांचे ट्विट खूप चर्चेत आहे.
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदला मुंबई पोलिसांकडून नोटीस; आज होणार चौकशी