मुंबई : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 12 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यात होणाऱ्या जोरदार पाऊसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामुळेच जनतेचे सगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होऊन शपथविधी होणार आहे. . दरम्यान, या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”.
पुढे ते म्हणाले, “मागच्या बऱ्याच दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. तो लवकरात लवकर होईल, असचं सांगण्यात येत होत. मात्र, नुकताच त्यांना दिल्ली दौरा झाला आहे आणि आज त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे असं वाटत.”