Ajit Pawar । मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजित पवार हे लवकरच राज्याचे नवीन मुख्यमंत्री (CM) असतील असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. पवारांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलू दाखवली होती. (Latest Marathi News)
नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. “जर मी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो,” असे वक्तव्य मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोले यांनी केले आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ते माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते पत्रकाराला उद्देशून म्हणाले की, “अरे कितीदा, आता काय स्टॅम्पवर लिहून द्यायच का? ५० वेळा तेच-तेच चालल आहे.”
Havaman Andaj । विदर्भातील शेतकरी संकटात! ‘या’ पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा