
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता उद्धव ठाकरे यांनी देखील तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
उद्धव ठाकरे म्हणाले, चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरलाय. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. त्यामुळे आता लढाईला दिशा द्यावी लागेल, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
नेमकं काय आहे प्रकरण?
मोदींना त्यांच्या आडनावावरुन डिवचने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान मोदी या आडनावावरून टिपण्णी केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने आता निकाल दिला असून राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटक येथे राहुल गांधी यांची मोदी ( Modi) आडनावावरून जीभ घसरली होती. यावेळी भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी भावंदी अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता.