सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. महाराष्ट्रामध्ये रोज नवनवीन गुहन्यांबाबत माहिती आपल्याला मिळत आहे. दरम्यान सध्या मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या १८ वर्षांच्या तरूणीची मंगळवारी चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतीगृहात हत्या झाल्याची आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Churchgate Hostel Murder Case) या प्रकरणावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “मुंबईतील चर्चगेट भागात सावित्रीबाई फुले वसतिगृहात त्या तरुणीबाबत दुर्दैवी घटना घडली. यानंतर तिचे गावाकडून तिचे कुटुंबातील सदस्य मुंबईला आले. मुलीच्या आईला दोन जुळे मुले असून दहावीनंतर मुलाने पुण्यात आयटीआय करण्यासाठी प्रवेश घेतला. आणि मुलगी मुंबईमध्ये शिक्षणासाठी आली होती.”
“मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार” – शरद पवार
“मी जी शंखा उपस्थित केली होती ती खरी ठरल्याचे दिसत आहे. या वसतिगृहामध्ये ४५० मुलींची व्यवस्था आहे. मात्र तिथे फक्त १० टक्के मुलीच राहतात. महत्वाचं म्हणजे पीडित तरुणी एकटीच चौथ्या मजल्यावरील एका रुममध्ये राहत होती. वसतिगृह खूप मोठं आहे सर्व मुली एकाच मजल्यावर राहिल्या असत्या. त्या सर्व मुलींना एकाच मजल्यावर का ठेवलं नाही?” असा सवाल देखील अजित पवारांनी विचारला आहे.
कोल्हापूरच्या घटनेवर ठाकरे गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधी पक्ष कधीही मागे…”