अदानी प्रकरणात जेसीपी नेमण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे शरद पवारांनी जेपीसी नेण्याबाबत भाजपचे समर्थन केले आहे तर दुसरीकडे काँग्रेस जेपीसी नेमणूक करण्यावर अडून आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचा अदानीसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
उर्फीच्या जीवनाची अजब कथा वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) सध्या सातारा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे नेते अमित कदम व इतर नेते राष्ट्रवादी ( NCP) मध्ये प्रवेश करणार आहेत. दौऱ्यावर असताना अजित पवारांना व्हायरल फोटोबाबत प्रश्न विचारला असता, अजित पवारांनी शरद पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच अदानी यांची पाठराखण देखील केली आहे.
नवीन गाडी चालावायला शिकण्यासाठी बाहेर गेले अन् गमावले प्राण; अपघातात बाप-लेकाचा मृत्यु
अदानींसोबतच्या फोटोबद्दल प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांचीच उलटतपासणी केली असून अदानींसोबतचाच फोटो आहे ना ? कोणत्या अंडरवर्ल्ड डॉन सोबत तर फोटो नाही काढला ना ? असे प्रतिप्रश्न केले. तसेच कोणालाही लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये असे देखील ते म्हणाले.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? चंद्रकांत पाटील यांनी केले सूचक वक्तव्य…
यावेळी अलका लांबा ( Alka Lamba) यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या ट्विटविषयी अजित पवारांना विचारले असता, अजित पवार प्रचंड संतापले आणि म्हणाले की, ” कोणी आम्हाला काही म्हंटल तरी आमच्या अंगाला भोक पडत नाहीत. आम्ही कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही आहोत. जे महत्त्वाचे आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ.”