राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येतो की काय? अशी परिस्थिती मागील काही दिवसांत तयार झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी बंडखोरी करतील, ते भाजपसोबत हातमिळवणी करणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच फुटणार अशा वावड्या राजकीय वर्तुळात उठल्या होत्या. ( Ajit Pawar rumour) परंतु, या सगळ्या चर्चा व अफवांवर आता पडदा पडला आहे.
राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार यांनी बोलावली आमदारांची बैठक
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण श्वासात श्वास असेपर्यंत राष्ट्रवादी सोबत असणार आहोत असे स्पष्ट केले. यामुळे मागील काही दिवसांत सुरू असणाऱ्या राजकीय तर्कवितर्कांना अचानक ब्रेक लागला आहे. दरम्यान या चर्चा खऱ्या होत्या का ? खरंच अजित पवार भाजप सोबत जाणार होते का ? शरद पवारांनी अजित पवारांना रोखले का? या सगळ्यात शरद पवारांची भूमिका काय होती ? असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
अजित पवार व संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी! आरोप -प्रत्यारोप झाले सुरू…
मात्र अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. ते राष्ट्रवादी सोबतच असणार आहेत. या मतावर शरद पवार ( Shard Pawar) अगदी सुरुवातीपासूनच ठाम होते. मधल्या काही काळात अजित पवारांबाबत उठलेल्या अफवा व राजकीय वर्तुळात व्यक्त होंत असणारी सर्व शक्यता शरद पवारांनी फेटाळून लावल्या होत्या. एवढंच नाही तर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अजित पवारांच्या सर्व हालचालींबाबत शरद पवारांना आधीच माहिती होती. यावेळी त्यांनी योग्य ती पाऊले उचलत अजित पवारांची बंडखोरी रोखली आहे.
“नितेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी” संग्राम जगताप यांची जोरदार टीका