
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. पक्षामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्याने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)
“फडणवीस मोंदींची थुंकी झेलून म्हणाले”…. ‘सामना’ तून भाजपवर बोचरी टीका
राष्ट्रवादीतील किती आमदार अजित पवार यांच्या पाठिशी आहेत हे अजूनही निश्चित झाले नसल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अजित पवारांसह त्यांच्यासोबत शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे सर्व मंत्री निलंबित होणार, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार गट अडचणीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भीषण अपघात! ट्रकने चार वाहनांना चिरडले, एकाच जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रातील सरकार वैध आहे की अवैध सरकार आहे हे त्यावरून निश्चित होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवसेना (Shivsena) निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागेल. या सर्व परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जबाबदार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.