कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. (Latest Marathi News) समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वात मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणूका समोर ठेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जी दंगल झाली आहे त्याला कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये तणावाचे वातारवरण निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणचे इंटरनेट देखील बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद (Internet Service) करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी दिली आहे.