Ajit Pawar । केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Date) जाहीर करणार आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. कारण राज्याच्या दोन पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Ambadas Danve । ब्रेकिंग! अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार?
एका सभेदरम्यान, अजित पवारांनी दोन वक्तव्ये केली आहेत. बोलताना ते म्हणाले की, “एका व्यक्तीला मोक्का लागणार होता, पण मी तो लागू दिला नाही. आता इथून पुढं माझ्याकडं यायचं नाही असं अजित पवार म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, “साखर कारखान्यावर इनकम टॅक्सची टांगती तलवार होती. मागील 25 वर्षांचं व्याज असून ते व्याज 10 हजार कोटी इतकं होतं. पण हे व्याज अमित शहा (Amit Shah) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामुळे माफ झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis । राजकारणात खळबळ! देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य
अजित पवारांच्या या वक्तव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची असलेली कृपा या वक्तव्यातून दिसते. त्यामुळे अजित पवार हे शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून भाजपकडे गेले असतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.