मुंबई : सध्या राजकीय वातावरणामध्ये अनेक वेगेवेगळ्या घडामोडी घडताना दिसतायेत. त्यामध्ये आता आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर आरोप करताना दिसून येतं आहे. यामधेच काल (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारकडून 10 म्हशींची डेअरी खोलण्यासाठी मिळणार 7 लाखांचे कर्ज
अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते पण यामध्ये फक्त शरद पवार यांचाच अर्ज आला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच नावावर चालतो, हे सर्वांनाच माहितीये. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत, अशी सर्वांची इच्छा होती. त्यामुळे सर्वांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली”.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागात दिला रेड अलर्ट
मागच्या दोन वर्षात कोरोना संकट असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आलं नाही. महाराष्ट्रासह देशात देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोनाच संकट दूर झालं आहे. त्यामुळे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशनं घ्यावीच लागतात. असा देखील उल्लेख अजित पवारांनी केलाय.