
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुनावणी होणार आहे. याबाबत अजित पवारांनी एक वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी कायमच पुढे ढकलत आहे.” असं म्हणत अजित पवारांनी सरकारबद्दल नाराजी व्यकत केली आहे.
तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत खडकी शाळेची चमकदार ‘कामगिरी’
पुढे अजित पवार म्हणाले, १० महिन्यानंतर देखील अजून निवडणूक लवकर झाल्या नाहीत. या निवडणुका लवकर व्हायला पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी (Unemployment), शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत त्यावर विचार व्हायला हवा असं देखील अजित पवार म्हणाले.
ऊसतोड मजुराची एक मुलगी बनली इंजिनियर तर दोन मुली बनणार डॉक्टर; वाचा सविस्तर
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी महाराजांविषयी केले वक्तव्य महाराष्ट्रामध्ये खपवून घेतले जाणार नाही. राज्यपालांना पदावर बसवणाऱ्यांनी त्यांना समज द्यावी. यासंदर्भात विचार करावा कारण महत्त्वाचे विषय सोडून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.
पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये दुधाला मिळतोय ‘इतका’ दर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!