पुण्यात आज कसबा व चिंचवड पोटनिवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ( kasba Chinchwad Assembly Elections) दोन्ही ठिकाणी भाजप व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. या निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवारांच्यां प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग घेतला होता.
धक्कादायक घटना! डीजेवर नाचता नाचता खाली कोसळला, अन् १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला
प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतल्याचा मुद्दा घेऊन आज अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. मात्र सत्ताधारी प्रचारात मग्न आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत. आता अजित पवार यांच्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, “प्रचारात उतरलो असलो तरी आमचे काम २४ तास सुरूच असते.
मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “पुण्यात आम्ही प्रचाराला गेलो त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी गेलं तर त्यात एवढं पोटात दुखण्यासारखं काय आहे?” असा सवाल देखील फडणवीसांनी यावेळी केला आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
बिग ब्रेकिंग! गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये जेलमध्येच हाणामारी; दोन जागीच ठार