अजित पवार यांची ‘ती’ भीती झाली खरी! पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का

Pawar

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. या आघाडीतील सर्वात तडफदार नेते हळूहळू दुसऱ्या पक्षात जाऊ लागले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा धक्का बसणार आहे, कारण आता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे राष्ट्रवादीची साथ सोडून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह BRS मध्ये प्रवेश करणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईमध्ये तुफान पाऊस, 2 जणांचा मृत्यू, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

भगीरथ भालके हे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पूत्र असून जर भालके राष्ट्रवादी सोडून BRS मध्ये गेले तर पक्षाला आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये खूप मोठा फटका बसणार आहे. दरम्यान नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीआरएस आणि एमआयएमला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असे सूचक वक्तव्य केले होते. आता त्यांची ही भीती खरी झाली आहे.

75 व्या वर्षी तिला हवा होता जोडीदार पण… लग्नाच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची फसवणूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना आगामी निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. तेव्हापासून भगीरथ भालके नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 27 जून रोजी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंढरपुरच्या दौऱ्यावर असून त्यावेळी भालके हजारो कार्यकर्त्यांसह BRS मध्ये प्रवेश करतील.

Kuljit Pal Passed Away । ब्रेकिंग! चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध निर्मात्याचे निधन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *