
Ajit Pawar । पिंपरी चिंचवड : बंगळुरू पुणे-मुंबई महामार्गवरील वाकड या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. (Ajit Pawar on Wine and Grapes) त्यावेळी त्यांनी भाषणात अनेक किस्से सांगितले. वाईन कोणाला चढते आणि कोणाला चढत नाही हे सांगताच द्राक्ष परिषदेत एकच हशा पिकला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Latets Marathi News)
“काहीजणांना एक वाइन पिली की किक बसते तर काहीजणांना पूर्ण खंबा मारला तरी किक बसत नाही, कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो. तर कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. परंतु , सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श देखील केलेला नाही, असे गुपितच अजित पवार यांनी भर सभेत सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. (Maharashtra DCM Ajit Pawar on Wine and Grapes)
Agriculture news | कीटकनाशकांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात, फळबागांना बसेल फटका
“देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळे काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकत आहेत. परंतु ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्ष पासून तयार होणारी वाईन्स यामध्ये खूप फरक आहे. काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाईन्स पितात. आदरणीय शरद पवारसाहेब कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mobile Hacked Sign । तुमचाही फोन हॅक झालाय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी