Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाव आणि वेश बदलून विमानाने प्रवास केल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची नवी दिल्लीत दहा वेळा भेट घेतल्याची कबुली दिली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेशात आणि नाव बदलून विमानात प्रवास केल्याचे सांगितले होते. यावर आता अजित पवारांनी यू-टर्न घेतला आहे. (Politics News )
Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचे फोन आणि व्हॉट्सॲप हॅक
अजित पवार म्हणाले, “माध्यमांमध्ये माझ्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण केले गेले. काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल एक भ्रम निर्माण झाला होता. मी वेश बदलून दिल्लीला जायचो अशा बातम्या आल्या. ही बातमी कशाच्या आधारे आली हे मला माहीत नाही, त्यानंतर मी एकदा सांगितले होते की, अजित पवार कोणत्या नावाने आणि कोणत्या वेशात दिल्लीला गेले होते हे सर्वांनी सीसीटीव्ही तपासावे. फ्लाइट दरम्यान सर्व माहिती मिळवा. संगणक देखील तपासा. ते कोणी सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असेही ते म्हणाले.
Ajit Pawar । अजित पवारांवर हल्ला होणार, गुप्तचरांना मिळाले इनपुट; धक्कादायक माहिती समोर
पुढे ते म्हणाले, जर हे आरोप सिद्ध झाले नाहीत तर ज्यांनी माझ्यावर सभागृहात किंवा कोठेही आरोप केले त्यांनी राजकारण सोडावे, अशी भूमिका मी घेतली आहे. या भूमिकेनंतर कोणीही पुढे आले नाही. लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करण्याचे कारण नव्हते. त्याआधीही माझ्याबद्दल असेच गैरसमज होते. असं ते म्हणाले.
Uddhav Thackeray । ‘उद्धव ठाकरेंना हिंदी-इंग्रजी येत नाही..’ बड्या नेत्याचा खोचक टोला