Ajit Pawar । महायुतीच्या काही जागांवर अजूनही तोडगा निघाला नाही. महायुतीत घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. या पाचही जागांवर विजय मिळवणे हे पक्षाच्या फुटीनंतर आव्हानच असणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभेत विजयी होण्यासाठी सर्वात मोठी खेळी खेळणार आहेत. (Latest marathi news)
बारामती, शिरूर, परभणी, रायगड, धाराशिव या पाच जागा निवडून आणण्याची रणनीती राष्ट्रवादीने केली आहे. ५ लोकसभा मतदार संघामध्ये उरलेल्या ४२ लोकसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते हे या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार असून त्यासाठी प्रत्येक वार्ड आणि प्रत्येक घरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहचणार आहेत.
MI vs CSK । लाईव्ह मॅचमध्ये रोहित शर्माची फिटली पँट; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पण संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत पार पडणार आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Aditya Thackeray । राजकारणातून मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट