Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । अजितदादांवर पुतण्याचा पहिल्यांदाच निशाणा, म्हणाला; “त्या चौकशीचं काय झालं?…”

Ajitdad's nephew targeted for the first time, said; "What happened to that interrogation?..."

Ajit Pawar । जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायरब्रॅन्ड नेते अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याच्या निर्णय महाविकास आघाडीला फारसा रुचला नाही. राष्ट्रवादीमध्ये (NCP) दोन गट पडल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

Agriculture News । मिळवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच करा बांबूची शेती, सरकारही करेल मदत

काल त्यांची जळगावमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काका अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली. “त्यांची बदलेली भूमिका राज्याला आवडली नाही. बारामतीतही अतिजदादा परत या अशा घोषणा दिल्या गेल्या. ते मतदार आहेत. ते बोलणारच परंतु मला त्यावर काहीच भाष्य करायचं नाही”, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. (Rohit Pawar vs Ajit Pawar)

Sharad Pawar । “शरद पवार खुनी आहेत”; टीका करताना शिवसेनेच्या बड्या नेत्याची घसरली जीभ

“महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी चेंगराचेंगरी झाली होती, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर ज्युडीशिअल इन्क्वायरी व्हावी अशी मागणी केली परंतु अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. त्या चौकशीचं काय झालं? सरकारच्या या चौकश्यांच्या घोषणांना बळी पडू नका,” असे आवाहनही रोहित पवारांनी यावेळी केले आहे.

Kirit Somaiya । किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Spread the love
Exit mobile version