Ajit Pawar । पुणे : राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी जोमाने तयारी सुरु केली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडले. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जनता कोणाला निवडून देते याबाबतची उत्स्कुता शिगेला पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्र्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार ( Parth Pawar) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. (Latest Marathi News)
आता त्यांच्यासाठी मतदार संघ शोधण्यात आला आहे. पार्थ पवार यांना बारामती मतदारसंघातून नाही तर शिरुर मतदार संघातून उभे करण्याची तयारी सुरु आहे. या मतदार संघात शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार सोडले तर सर्व आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना शिरुर मतदार संघातुन निवडून येण्यास कोणीतही अडचण येणार नाही. (Ajit Pawar and Parth Pawar)
Accident News । भयानक दुर्घटना! लिफ्ट कोसळून ४ जणांचा जागीच मृत्यू तर ५जण गंभीर जखमी
काही दिवसांपासून बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पार्थ पवार हे आगामी निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढतील अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत गेल्यामुळे अजित पवार गटाकडे बारामती किंवा शिरुर लोकसभा मतदार संघ जाण्याची दाट शक्यता आहे. राजकीय भूकंपामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Manoj Jaranage Patil । उपोषण सोडले तरीही मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी, जाणून घ्या यामागचं मोठं कारण