Ajit Pawar । बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी, बायको म्हणते, “जरा दमानं घ्या..”

Ajitdad's stormy lashing in front of Baramatikars, wife says, "Take it easy.."

Ajit Pawar । बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) फुटीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथमच बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मोठ्या जल्लोषात बारामतीकरांनी (Baramati) त्यांचे स्वागत केले. असंख्य कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अजित पवार पुढे जात होते. या स्वागतानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजीही केली. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; माजी आमदाराने केला शिंदे गटामध्ये प्रवेश

“ज्या प्रकारे माझे स्वागत केले गेले, ते मी पहिल्यांदा पाहत होतो. माता-भगिनी मला ओवाळत होत्या. तरुणांचं प्रोत्साहन मिळत होते. मी कोणावरही बळजबरी केली नव्हती. बारामतीकरांचे हे एक प्रकारचे प्रेमच होते. मला अनेक लोकांचा उत्साह, प्रेम, आपुलकी मिळत होती. बारामतीतील रस्त्यांनी एवढ्या फुलांच्या पाकळ्या कधीच पाहिल्या नव्हत्या. परंतु, इतकी ढकला-ढकली आणि रेटा-रेटी आयुष्यात मला कोणीच केली नाही,” असा चिमटाही अजित पवारांनी काढला.

Crop Insurance । पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

बारामतीकरांनी मला अनेक प्रकारच्या टोप्या घातल्या

पुढं ते म्हणाले की, ““मला इतक्या प्रकारच्या टोप्या घातल्या गेल्या. एक घातली की लगेच दुसरी, लगेच तिसरी. त्यामुळे आता मला विचार करावा लागणार आहे की किती वाजता उठून कामाला सुरुवात करायची आणि रात्री किती वाजता झोपायच. मला पहाटे उठून काम करायची सवय आहे. त्यामुळे अनेकवेळा माझी बायको मला म्हणते, जरा दमानं घ्या. हे काय चाललंय? जरा वयाचा विचार करा. परंतु कामातूनच खरं समाधान मिळते”, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ

“आज कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. अनेकांनी माझा हातात हात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला असं वाटलं की आता माझा हात तुटतोय की काय. काहीजण तर माझ्या हाताला किस करत होते, मुके घेतले. ‘मी म्हटलं आयला बायकोने कधी एवढे किस घेतले नाही. हे काय चाललंय तरी काय आज”, असे म्हणताच बारामतीकर लोटपोट झाले.

Astrology | नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तूशांती का करतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचं कारण

Spread the love