
पिकांना वन्यजीवांपासून जो त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी जालन्यातील ज्ञानेश्वरने अजब शक्कल लढवली आहे. जालना (Jalna) जिल्ह्याच्या देवमूर्ती गावातील शाळेत शिकणाऱ्या शाळकरी पोराने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनोखी बंदूक बनवली आहे.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!
वन्य प्राणी पिकांचे खूप नुकसान करतात, त्याला आळा घालण्यासाठी नववीत शिकत असलेल्या ज्ञानेश्वर खडके ने हा गजब प्रयोग केला. त्याच्या शेतातील पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्याचे वडिल राबराब राबतात उत्तम पीक आणतात परंतु वन्य प्राण्यांमुळे केलेलं सगळं कष्ट वाया जात होते, त्यामुळे ज्ञानेश्वरने हा सर्व मनस्ताप टाळण्यासाठी बंदूक बनवण्याचा निर्णय घेतला.
‘किसी का भाई किसी की जान’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; पाहा Video
PUC पाईप, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, छोटीशी दुर्बिण, हे सर्व साहित्य ज्ञानेश्वर ने वापरल आहे. ही बंदूक अत्यंत हलक्या प्रतीची आहे तर सायकलमधे हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपाच्या सहाय्याने या बंदुकीला एअर प्रेशर दिला जातो. आणि बंदुकीच्या पुढील पाईप मध्ये पुठ्ठ्यापासून बनवलेली बुलेट लावली जाते. त्यामुळे ही गोळी बटन दाबताच या हवेच्या प्रेशरने मोठा आवाज करत बाहेर जाते. त्यामुळे आवाज मोठा मात्र ही गोळी सौम्य असल्यामुळे याचा आघात कमी आहे आणि त्यामुळे प्राण्यांना हुसकावून लावण्यास फार मदत होतेय.
अन् शेतकरी ढसाढसा रडू लागला; पीक नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्र्यासमोर घडला हा प्रकार
या बंदुकीसाठी ज्ञानेश्वरला पाच दिवस आणि तीनशे ते चारशे रुपयांचा खर्च आला. त्याच्या या कमी खर्चिक आणि खूप उपयोगी पडणाऱ्या प्रयोगाचे गावभर कौतुक होत आहे.