ByElection Cancelled । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुका (Loksabha election) जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. आयोगाकडून काही पोटनिवडणुकांच्या निवडणुकाही जाहीर केल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)
हायकोर्टाने अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक (Akola West Assembly By-Election) रद्द केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन झालं असल्याने ही जागा रिक्त झाली होती. विशेष म्हणजे या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. पण आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही निवडणूक रद्द केली आहे.
Pakistan Terror Attack । धक्कादायक! पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू
समजा महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाली तर त्याचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर चारच महिन्यांचा कार्यकाळ तिथं निवडून आलेल्या आमदाराला मिळेल. पण यासाठी निवडणूक खर्च करणं आणि सुरक्षा यंत्रणा राबवणं हे निरर्थक आहे, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द केली आहे.