सध्या ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri) या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन (Karthik Aryan) मुख्य भूमिका साकारणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अक्षय कुमार (Akshay Kumar) या चित्रपटात काम का करणार नाही? आता अक्षयने या चित्रपटामध्ये काम न करण्यामागचं कारण देखील समोर आलं आहे.
“मला काही झालं तर…”, संजय राऊतांचा राज्य सरकारला गंभीर इशारा
मागच्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अक्षय म्हणाला होता ‘हेरा फेरी ३’ची कथा आवडली नाही म्हणून चित्रपट करण्यास नकार दिला आहे. पण आता याबाबत एक वेगळीच माहिती समोर आलीये. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “हेरा फेरी ३”साठी अक्षयने जवळपास ९० कोटी रुपये मानधन मागितलं होतं.
नियमित वीजबिल देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मात्र या चित्रपटासाठी ९० कोटी रुपये अक्षयला देण्यास निर्माते कबूल झाले नसून त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर कार्तिकला या चित्रपटाच्या भूमिकेसाठ घेण्यात आले. कार्तिक हा चित्रपट ३० कोटी रुपयांमध्ये करण्यास तयार झाला आहे.
ब्रेकिंग! भगतसिंग कोश्यारींची राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?