KBC हा टेलिव्हिजनवर लोकप्रिय झालेला खेळ आहे. अनेक स्पर्धक व सेलेब्रिटी यामध्ये खेळण्यासाठी सहभागी होतात. अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असून लवकरच या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) देखील दिसणार आहे. KBC च्या अगामी भागात अक्षय कुमार येणार असल्याचा एक प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
रानूला मिळाला कानू! सोशल मीडियावर राणू मंडलचा ‘या’ मुलासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल
या प्रोमो व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन अक्षय कुमारला तो महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊ शकतो का ? याबद्दल विचारतो. यावेळी अमिताभ यांच्या सांगण्यावरून अक्षय कुमार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देतो. यावेळी तो महिलांना सांगतो की, “स्वसंरक्षणाचा सर्वात सोप्पा व महत्त्वाचा उपाय म्हणजे जोरजोरात ओरडणे”. स्वसंरक्षणाची ही प्राथमिक टेक्निक असल्याचं अक्षय कुमार याचं म्हणणं आहे. या टेक्निकला अक्षयने एका महिलेसोबत प्रॅक्टिकली करुन पाहिले. यावेळी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी अक्षय जसा त्या महिलेच्या दिशेनं चालू लागतो, तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागते.
खूण करून तरुण फरार; परंतु पोलिसांनी शेवटी हिसका दाखवलाच!
याशिवाय KBC मध्ये स्वसंरक्षण शिकवताना अक्षय कुमार महिलांना पुढे म्हणतो की, सेल्फ डिफेन्स साठी निरीक्षण करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे फिरत असाल तर शांत ठिकाणच्या एरिया मध्ये सावधान असायला हवे. तसेच आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचे निरीक्षण करायला हवे. अक्षय कुमार स्वसंरक्षणाचे धडे देत असताना सर्व प्रेक्षकांमध्ये शांतता पहायला मिळत आहे.