मुंबई : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मागच्या काही वर्षांमध्ये त्याचे एका वर्षात चारपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झालेत. २०२२ मध्ये त्याचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘कठपुतली’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतु’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रीपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
उडीद उत्पादकांसाठी खुशखबर! दहा हजारांवर मिळतोय बाजारभाव
अक्षय कुमारची मुलगी नितारा हीचा आज वाढदिवस आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले की, “माझा हात पकडण्यापासून ते स्वत:ची शॉपिंगची बॅग पकडण्यापर्यंतच्या प्रवासात माझी लाडकी लेक मोठी झाली आहे. आज तू दहा वर्षांची झाली आहेस. माझे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत. बाबाकडून तुला खूप प्रेम.”
Abdul Sattar: “कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा” ; अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य
व्हिडीओमध्ये दोघे बाप लेक वाळवंटातल्या एका टेकडीवर चढाई करताना दिसतायेत. त्याचबरोबर त्याने निताराचा तिची शॉपिंगची बॅग उचलतानाचा फोटोही या व्हिडीओला जोडला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते कमेंट करत अक्षयच्या मुलीला शुभेच्छा देत आहेत.