अभिनेता अक्षय कुमारने नुकताच मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातून अक्षय शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दरम्यान दरम्यान अक्षय कुमारने एक नवीन घोषणा सोशल मीडियावर केली आहे. यावर्षी अक्षय कुमारचे सलग चार चित्रपट येऊन गेले. परंतु, यातल्या एकाही चित्रपटातून त्याला हवे तसे यश मिळाले नाही. म्हणून अक्षय कुमार आता नवीन ( New announcement from Akshay Kumar) काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने (Akshay Kumar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्याने नवीन गोष्ट करण्याची गोष्टच निराळी असून गेल्या काही दिवसांपासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीबद्दल लवकरच तुम्हाला माहिती मिळेल असे सांगितले आहे.
फॉर्म १०A सबंधी आयकर विभागाचा आऊटरिच कार्यक्रम पार पडला!
बच्चन पांडे, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, राम सेतू, कटपुतली या चारही चित्रपटांच्या अपयशानंतर अक्षय कुमार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय कुमारने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी हेराफेरी (Heraferi) या चित्रपटाबद्दल अंदाज लावणे सुरू केले आहे. इतकेच नाही तर अनेक लोकांनी वेलकम 3, आवारा पागल दिवाना 2 हे अक्षयचे पुढील प्रोजेक्ट असतील अशी शक्यता वर्तवली आहे.